व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोमागचं सत्य सांगत शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काही दिवसांपूर्वी अलिबाग पोलिसांनी अ.टक केली होती. अर्णव गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील नेते व विरोधी पक्षातील नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची खेळी अद्याप देखील चालूच आहे.

अशातच आता सोशल मीडियावर अन्वय नाईक यांची पत्नी व मुलीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादीवर अनेक लोक टीका करत आहेत. यामुळे आता शरद पवार यांनी स्वतः या फोटोबाबत सत्य सांगितलं आहे.

अन्वय नाईक यांच्या परिवारासोबतचा माझा फोटो पाच वर्षांपूर्वीचा आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसेच शरद पवार यांनी यावेळी राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल जी चिंता व्यक्त केली त्यावरून राज्यपालांना देखील टोला लगावला आहे.

अर्णब प्रकरणावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली होती. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली होती. शरद पवारांनी यावरुनच राज्यपालांना काल टोला लगावला होता.

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आ.त्मह.त्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अ.टकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. स्थानिक न्यायालयानं अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात अर्णव गोस्वामी यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वामी यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता.

मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वमिंचा जामीन अर्ज फेटाळताच अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आज अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. आज अखेर अर्णव गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला आहे. अर्णव गोस्वामी यांची न्यायालयीन कोठडीतून आता सुटका होणार आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अर्णव गोस्वामींचा अखेर अंतरिम जामीन मंजूर

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट! म्हणाले रश्मी ठाकरे यांनी नाईकांची जमीन घेत…

फडणवीसांचं कौतुक करत राऊतांचा कॉंग्रेसला टोला! लवकरच मोठा राजकीय भूकंप पहायला मिळणार?

सुशांत सिंह राजपूतची बहीण अर्णव गोस्वामींना समर्थन देत म्हणतेय…

धक्कादायक! अर्णव गोस्वामी का.रागृहात मोबाईल वापरत होते, पोलिसांनी केली कठोर कारवाई