रेखानं ‘या’ अभिनेत्यासोबत केलं होतं लग्न, मात्र अवघ्या काही दिवसांतच तुटलं नातं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

मुंबई | रेखा ही एक अशी अभिनेत्री आहे जिच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. मात्र, तिला खासगी आयुष्यात खरं प्रेम कधी मिळालंच नाही. रेखा यांच्या प्रेमाबद्दल अनेक चर्चा रंगवून सांगितल्या जातात. कधी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं नातं तर कधी वयाने लहान असलेल्या अक्षय कुमारशी त्यांचं नाव जोडलं गेलं. विनोद मेहरा यांच्या सोबतच्या नात्याचीही अनेकदा चर्चा होते.

प्रेम कहाण्या तर अनेक आहेत. पण काही प्रेम कहाण्या खुप जास्त प्रसिद्ध असतात. बॉलीवूडमध्ये देखील अशाच काही प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. खुप कमी लोकांना त्यांच खरं प्रेम मिळतं. तर खूप लोकांना ते मिळतही नाही पण ते आयुष्यभर हृदयावर कोरलं जातं.असंच काहीसं या अभिनेत्रीच्या आयुष्यात देखील घडलं आहे.

रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखा आणि विनोद मेहराने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचा ‘घर’ हा चित्रपट विशेष गाजला आहे. हे दोघे खूप अगोदरपासून एकमेकांचे मित्र होते. मात्र, घर चित्रपटाच्या शूटिंगवेळी या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली होती.

यावेळी विनोद रेखाच्या सौंदर्यावर फिदा झाला. तर रेखाला विनोदच्या स्वभावाने भुरळ घातली. 1973 मध्ये तर फक्त रेखा आणि विनोद यांच्या लग्नाच्याच चर्चा होत्या. वृत्तपत्रावर फक्त रेखा आणि विनोद या दोघांच्या नात्यावर लिहिले जायचे. यादरम्यान विनोद मेहराने रेखाला लग्नासाठी प्रपोज केले आणि रेखाने लग्नाला होकार दिला.  याचवेळी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे लग्न दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकलं नाही.

विनोद आणि रेखाने कोलकत्ता येथे लग्न केलं. या लग्नाबद्दल खूप कमी लोकांना माहिती होती. लग्नानंतर ते दोघे मुंबईला आले. त्यांच्या लग्नाबद्दल विनोद मेहराच्या आईला समजले. विनोद यांच्या आईला हे लग्न मान्य नव्हतं. विनोद यांच्या आईने रेखाला सून म्हणून स्विकारायला स्पष्ट नकार दिला होता. एकतर आई किंवा रेखा अशीही अट विनोदला आईने घातली होती. अशा परिस्थितीत विनोद यांनी आईचा पदर धरला आणि रेखा यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

रेखाने विनोदच्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला. पण विनोनच्या आईचे वाईट शब्द ऐकून रेखा अखेर रडली होती. प्रेमात पुन्हा एकदा अपयश मिळालेल्या रेखा यांनी वि.ष पिऊन आ.त्मह.त्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर त्यांना केलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि त्यांनी स्वतः याबद्दल मीडियाला सांगितलं.

एका मुलाखतीत रेखा यांनी सांगितलं होतं की, नातं तुटल्यानंतर त्यांनी आ.त्मह.त्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण थोड्या दिवसांनी त्यांनी स्वतःला सावरलं आणि विनोद यांच्या सोबतची मैत्रीही कायम ठेवली. विनोद मेहराच्या शेवटच्या दिवसांमध्ये देखील रेखा त्यांच्या सोबत होत्या. १९९० मध्ये विनोद मेहराचे निधन झाले. तर रेखा आजही अविवाहित आहेत. त्यांचे विनोदवर खुप प्रेम होते. पण शेवटपर्यंत त्यांना खरे प्रेम मिळाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

“पोलिसांनी मला जाड बुटाने मा.रहान करत जबरदस्तीने जीव गुदमरवणारे द्रव्य पाजलं”

उर्वशी सोबत बो.ल्ड सीन शूट करताना ‘या’ बड्या कलाकाराचा स्वतःवरील ताबा सुटला अन् मग…

अर्णव गोस्वामी यांच्या जामिनावर हाय कोर्टाची महत्वाची सुनावणी!

अभिनेता मिलिंद सोमण गोव्याच्या बीचवर न्यू.ड होवून पळाला अन् मग…

बो.ल्ड सीन शूट करताना मिथुनचा ताबा सुटला आणि त्याने माझ्यावर…; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!