मुकेश अंबानींकडून तब्बल इतक्या कोटींची मदत; महाराष्ट्रासह आणखी या राज्यालाही केली मदत

मुंबई | कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी रिलायंसने पीएफ रिलीफ फंडला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रिलायंस कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 कोटींची मदत करणार आहे.

मला विश्वास आहे की भारत लवकरच कोरोनावर विजय मिळवणार आहे. या कठीण काळात रिलायंस कंपनीची संपूर्ण टीम देशासोबत आहे. कोरोनाला संपवण्यासाठी आपण पूर्णपणे मेहनत घेऊ, असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर रिलायंस कंपनीने पुढच्या 10 दिवसांसाठी 5 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

रिलायंस कंपनी दररोज एक लाख मास्क बनवत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्त्वपूर्ण भूमिका निभवतात. त्यामुळे रिलायंस कंपनी मोफत मास्क वाटत आहे.

दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा कंपनी आणि सामाजिक संस्थेकडून एकूण 1500 कोटींची मदत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ‘पार्ले जी’ या बिस्किट कंपनीने तीन आठवड्यात तीन कोटी बिस्किट पुडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-‘सरकार एकटं नाही लढू शकणार’; कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘नाम’चा मदतीचा हात

-‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा, काटकसरीने वागा- शरद पवार

-प्रवरा मेडिकल ट्रस्ट 6 दिवसात उभारणार ‘कोविड 19’चे नवीन हॉस्पिटल; मदतीचं आवाहन

-क्रिकेटप्रेमींना भारत- पाकिस्तान सामन्यांमधला थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार!

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 70 हजार स्थलांतरित कामगारांविषयी घेतला मोठा निर्णय