गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील

मंबई | राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंगविषयी चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं असून त्यामध्ये अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली त्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी बोलले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता, मात्र त्यांनी चार दिवस वेळ लावला, असं सांगत चंद्रकांतदादा पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘चीनने खरं काय ते सांगितल्यास…’; जर्मनीची चीनला विनंती

-कराडकरांची चिंता वाढली, आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह सापडले!

-रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज अदा केले पाहिजे – जावेद अख्तर

-संजय राऊत यांची काल राज्यपालांच्या कारभारावर टीका; आज देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला

-ही तर सुरूवात कोरोनाचा विनाश अजून दिसायचाय; WHO चा धडकी भरवणारा इशारा