“काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”

मुंबई | अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात काल त्यांना प्रकती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं.

अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वावर हा दुसरा आघात झाला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फलंदाज मोहम्मद कैफ आदी क्रिकेटपटूंनी ऋषी कपूर यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

-माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प

-एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो- राज ठाकरे

-भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची आहे, त्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे- जयंत पाटील

-“…तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे अधिक लोकांचा मृत्यू होईल”