सुशांत प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीची तब्बल 9 तास चौकशी; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे!

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सर्वांनाच चटका लावून गेली. सुशांतच्या या मृत्यूला बाॅलिवूडची गटबाजी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कंगना राणावत, विवेक ओबराॅय सारख्या कलाकारांनीही याला दुजोरा दिलाय.

sushant 1

सुशांतच्या आत्महत्येचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. सुशांतचे कुटूंबीय, नातलग व जीवलग मित्रांसोबतही पोलिस या मृत्यूचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्नात आहे. सुशांतला नाकारण्यात आलेले चित्रपट व बाॅलिवूडचा दबावगट या अनुषंगानेही तपास केला जाईल. असं पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

sushant sing rajput 2

बाॅलिवूड कलाकार रिया चक्रवर्तीचीही पोलिसांनी तब्बल ९ तास चौकशी केली. सुशांत व रिया रिलेशनमध्ये असल्याचं नुकतंच समोरं आलं आहे. पोलिसांकडून दोघांच्या नात्याबद्धल कसून तपास करण्यात आला. चौकशी दरम्यान रियाकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले.

riya 3

रिया म्हणाली, जेव्हा आम्ही दोघे रिलेशनमध्ये नव्हतो. तेव्हा सुशांतनं मला यशराज फिल्म सोडण्यास सांगितलं. रियाला सुशांतच्या या सांगण्याचा काही अर्थ समजला नाही. म्हणून असं का? असा प्रश्नही तीनं सुशांतला विचारला. सुशांतने यावर काहीच न बोलता यशराज फिल्म सोडत असल्याचं फक्त सांगितलं. मात्र मला यशराज फिल्मबाबत कधीच चुकीचं वाटल नाही. म्हणून मी यशराज फिल्म प्रोडक्शनसोबत कायम राहीले.

riya 2 e1592559694207

दोघांच्या नात्याबद्धल बोलताना रिया म्हणाली, सुशांत यशराज फिल्मच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटात काम करत होता. मलाही यशराजच्या ‘मेरी डॅड की मारूती’ या चित्रपटात काम करण्याची नुकतीच संधी मिळाली होती. यानंतर आम्ही अनेक चित्रपटांच्या पार्टीत भेटत गेलो. यादरम्यान आमच्यात चांगली मैत्रीही झाली. शेवटी २०१९ मध्ये सुशांतनेच मला प्रपोज केला. मलाही सुशांत आवडायचा. तेव्हापासून आम्ही रिलेशन असल्याचं रियानं सांगितली.

riya 4

रिया पुढे म्हणाली, २०१९ साली ‘दिल बेचारा’ चित्रपटाचं शूटींग पूर्ण झाल्यापासून सुशांत अस्वस्थ होता. तो डिप्रेशनमध्ये जात असल्याची लक्षणंही आढळून आली. सुशांत मात्र याकडे दुर्लक्ष करत गेला. त्याचा डिप्रेशनचा त्रास वाढतच गेला. शेवटी रियाच त्याला दवाखान्यात घेऊन गेली. मात्र सुशांत गोळ्या वेळेवर कधीच घेत नसल्याचं तीनं सांगितलं.

riya e1592559650923

रिया सुशांतची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी राहू लागली. बरेच दिवस ती सुशांतसोबत राहिली. मात्र अचानक सुशांतनंच तीला घरातून जायला सांगितलं. सुशांतला काही दिवस एकटं राहायचं होतं. शेवटी त्याचा हट्ट वाढत गेला म्हणून रिया त्याच्या घरातून निघून आली.

shudh desi romance e1592559805728

रिया व सुशांत एका चित्रपटात सोबत काम देखील करणार असल्याचं रियानं सांगितलं. रूमी जाफरी या चित्रपटाचे दिग्दर्शक तर वासू भगनानी या चित्रपटाचे निर्माते होते. चित्रपटाची मे महिन्यात शूटींगही सुरू होणार होती. मात्र लाॅकडाऊन लागू झाल्यानं हे शूटींग लांबणीवर पडलं. सुशांत आपल्या भविष्यातील प्रोजेक्टवर काम करत होता. तो या प्रोजेक्टमध्ये चांगलाच गुंतला होता. रियादेखील सुशांतच्या या प्रोजेक्टमध्ये त्याला मदत करणार होती.

sushant sinh rajput

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतला यशराज फिल्मच्या ‘औरंगजेब’ चित्रपटासाठी ऑफर मिळाली होती. त्यानं मात्र या चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला होता. यानंतर यशराज फिल्मच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटात तो झळकला. ‘औरंगजेब’ चित्रपटासाठी सुशांतनं नकार देण्यामागचं खरं कारण काय याचा तपास आता केला जात आहे.

Sushant 987

सुशांतच्या आत्महत्येला दिग्दर्शक करण जोहरलाही जबाबदार धरलं जात आहे. यावर सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांनी महत्वाची माहिती पोलिसांना दिली. श्रुतीच्या माहितीनुसार, सुशांतनं करणच्या ‘ड्राईव्ह’ या चित्रपटात नुकतंच काम केलं होतं. मात्र श्रुतीला त्यानं चित्रपटाच्या डबिंगसाठी डेट दिली नव्हती. श्रुतीनं सुशांतला विचारल्यावर तो म्हणाला की, मी 3 वेळा डबिंगसाठी डेट दिली होती. मात्र त्यांनी काहीच स्पष्ट सांगितलं नाही. यामुळं सुशांत व करणच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये काही वाद झाला होता का, याचाही तपास केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सीमेवरच्या जवानांच्या हातात काठी कसली देता?, तिथे काय RSS ची शाखा आहे का?”

-“कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”

-उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल- अजित पवार

-सत्ता हाती घेतल्यापासून शिवसेनेनं 100 टक्के समाजकारण केलं- आदित्य ठाकरे

-उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत