सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयच्या हाती सोपवलं असून सीबीआय सुशांत प्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. सध्या सीबीआय याप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे.

सीबीआयच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्ती अनेक महत्वाचे खुलासे करत आहे. रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट यांच्यामधील व्हाट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यापासून रिया आणि महेश यांच्या नात्याबद्दल सातत्यानं बोललं जात आहेत. रियानं आता सीबीआय चौकशीदरम्यान त्या व्हायरल झालेल्या व्हाट्सअॅप चॅटविषयी खुलासा केला आहे.

जेव्हापासून महेश भट्ट यांच्याबरोबर काम करत आहे तेव्हापासून महेश भट्ट आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. जेव्हा मी सुशांतचे घर सोडलं तेव्हा मी त्यांच्याबरोबर व्हाट्सअॅप वरून बातचीत केली होती हे अगदी खरं आहे, असं रियानं चौकशी दरम्यान म्हटलं आहे.

महेश भट्ट हे मला चाईल्ड म्हणतात आणि मी त्यांना सुरुवातीपासूनच सर बोलते. 8 जून रोजी मी त्यांना म्हटलं की मला घराबाहेर काढण्यात आलं आहे आणि मी आतमधून खूप कोलमडली आहे. सर त्याला कळात नाही का मी एवढे दिवस त्याची देखभाल केली आहे. त्याची देखरेख करता करता माझी अवस्था खूप खराब झाली आहे, असं रिया त्या दिवशी महेश भट्ट यांना व्हाट्सअॅपवरून बोलली असल्याचं रियानं सीबीआयला सांगितलं आहे.

यावेळी सुशांतविषयी बोलताना रिया भावूक झाल्यनं तिला अश्रू अनावर झाले होते. सुशांत विषयी अनेक महत्वाच्या गोष्टी रियानं रडत रडतच सांगितल्या आहेत. सुशांतनं रियाला घराबाहेर काढलेला क्षण सांगतानाही रियाला अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, सुशांतचे मित्र, सुशांतचे स्नेही, सुशांतचे कुटुंबीय अनेक लोक सुशांत संबंधित महत्वाचे खुलासे करत आहेत. नुकतंच चित्रपट निर्माता विवेक अग्नीहोत्रीनं सुशांत संबंधित अतिशय महत्वाचा खुलासा केला आहे. एका स्टारने सुशांतला तुझं करिअर संपवून टाकेल अशी धमकी दिल्याचं विवेक अग्निहोत्रीनं ट्वीटरवर सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”

दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

प्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराजे

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन