“मोदीजी, जरा बेरोजगारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घ्या म्हणजे अडचणी समजतील”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्वीट करत आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचं संकेत दिले होते. मात्र त्यांनी प्रेरणादायी महिलांना ओखळत असाल तर #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरून अर्ज करा. त्यांना मी माझं खात चालवायाला देणार आहे, असं सांगितलं आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कौतूक केलं आहे आणि त्यासोबत एक मागणीही केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपण #SheInspiresUs बाबत घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या कल्पनेमुळे देशातील अनेक भगिनींचं कर्तृत्त्व आपल्यापर्यंत पोहोचेल. अशाचप्रकारे बेरोजगार, शेतकरी व विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घेतल्यास त्यांच्याही अडचणी कळतील व त्यातून योग्य मार्ग काढता येईल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केंलं. अनेकांनी तर मोदी सोशल मीडिया वापरणार नसतील तर आम्ही देखील वापरणार नाही.

दरम्यान, आता कोणत्या महिलांची मोदींची सोशल मीडियावरील खाती चालवण्यासाठी वर्णी लागते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-सारथी संस्थेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड

-धक्कादायक! चोरट्यांनी चक्क भाजप नगरसेविकेलाच लुटलं

-“कायद्याचे रक्षकच जर भक्षक व्हायला लागले तर जनतेनी न्याय कोणाकडे मागायचा?”

-इंग्रजी शाळांमधील फी दरवाढीसंदर्भात बच्चू कडूंचं मोठं विधान!

-कोरोना व्हायरसचा दीपिकालाही तडाखा