“मंत्रिपदापेक्षा कार्यकर्त्यांना मी जास्त महत्वाचा आहे”

मुंबई | माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना मला दिलं जाणार मंत्रिपद महत्त्वाचं नाही. मंत्रिपद देताना अनुभवाला किंमत दिली जाते. मात्र मला जी जबाबदारी देतील ती मी पार पाडणार आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातील शेतकरी आणि सगळ्यांच्या भल्यासाठी काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यावर उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत कुठलाही कलह नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही मुद्यावरून मदभेद नाहीत. पक्षातील सर्व निर्णय शरद पवार घेतात. उपमुख्यमंत्रिपद हे कोणाला द्यायचं? हे आदरणीय शरद पवार ठरवतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, पक्षात उपमुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद सुरू नाही. पक्षातील वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. सध्या फ्लोर टेस्टबद्दल चर्चा सुरू आहे. आमच्या दृष्टीने विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षपदाची निवडणूक महत्त्वाची असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-