आशिष शेलारांची राष्ट्रवादीला बेडकाची उपमा; रोहित पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई |   2022 साली होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुंकलं आहे. आज कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेत यावेळी कमीत कमी 50 ते 60 नगरसेवर निवडून आले पाहिजेत, असं काम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित असल्याचं सांगितलं. अजित पवारांच्या या ‘मिशन’ची भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करून खिल्ली उडवली. त्यावर रोहित पवार यांनी शेलारांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीला बेडकाची उपमा देत बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत?, असं म्हणत शेलारांनी राष्ट्रवादीला डिवचलं. त्यावर रोहित पवार यांनी शेलारांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की “भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले ‘अच्छे दिन’ हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले ‘बुरे दिन’ हे अशाच अहंकाराचं फळ आहे”

आशिष शेलार यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या मुंबई मिशनवर टीकास्त्र सोडलं होतं. ते ट्वीट करून म्हणाले होते की, “राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!”

राष्ट्रवादीच्या मुंबई महानगरपालिका मेगाप्लॅनवर चंद्रकांत पाटील यांचा टोला-

“अजित पवार असं एक व्यक्तिमत्व आहे की जे अडचणीत असल्यावर खूप शांत असतात मात्र अडचणीतून बाहेर पडल्यानंतर असे काही बोलतात की डायर्केच आभाळाच हात लावतात. अजितदादांकडे जादूची कांडी आहे. ते 8 चे 60 नगरसेवक निवडून आणतील देखील… त्यांचं काही सांगता येत नाही”, असा गमतीशीर टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला होता.

राष्ट्रवादीचा मुंबई महानगरपालिका मेगाप्लॅन-

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने मेगाप्लॅन आखला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्र्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईतला आठवड्यातील एक दिवस देण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.

आशिष शेलार यांचं ट्वीट-

 

रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना दिलेलं प्रत्युत्तर-

महत्त्वाच्या बातम्या-

-छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढणे हे माझं स्वप्न होतं पण…- राज ठाकरे

व्यंगचित्रासाठी परफेक्ट चेहरे कोणते?; राज ठाकरेंनी सांगितली ‘या’ नेत्याची नावं!

-निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेलं राजकारण अत्यंत दुर्दैवी.. हे चांगलं नाही- राज ठाकरे

-अजितदादांकडे जादूची कांडी, ते 8 नगरसेवकांचे 60 करतील… काही सांगता येत नाही- चंद्रकांत पाटील

-जो शिवसैनिक नाणार रिफायनरीला समर्थन करेल त्याचं थोबाड फोडा- विनायक राऊत