Top news महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी ‘या’ प्रश्नांची उत्तर द्या- रोहित पवार

मुंबई |  महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम गाणाऱ्या कामगारांचा शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारने नुसता छळ मांडला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याशी विश्वासघात करण्यात आला असून, त्यांना आहे त्याच अवस्थेवर ठेवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना स्वगृही जाण्यासही भाग पाडण्यात येत आहे, अशी टीका उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्व जगाने पाहिले की तुमच्या सरकारने या मजुरांवर औषधांची फवारणी करत या लोकांना प्राण्यांसारखी अमानुष वागणूक दिली. जर तुम्हाला त्यांची इतकीच काळजी आहे तर पोट भरण्यासाठी त्यांना एवढ्या वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कोण आणि का आणत होतं?, सुरुवातीला त्यांना स्वत:च्या राज्यात येण्यापासून कोण आडवत होतं?, असा सवाल त्यांनी योगींना विचारला आहे.

परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वेसेवा सुरु करावी असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं होतं. मात्र त्याचा स्वीकार न करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात तुम्ही आवाज का उठवला नाहीत? असा महत्त्वाचा सवाल त्यांनी योगींना केला आहे.

महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप लावण्यापेक्षा करोनाविरुद्धच्या लढामध्ये एकत्र या आणि चाचण्यांची संख्या वाढवा. तसेच खालच्या स्तरातील नागरिकांचीही काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी योगींना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

-“योगीजी, कामगार-मजूरांना ‘आई’ सांभाळत नाही म्हणून ‘मावशी’कडे येतात”

-फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं

-राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

-बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार