उद्धवजी, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावरच कळेल किती आक्रोश आहे- राजू शेट्टी

बुलडाणा | शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कळेल किती आक्रोश आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार या कृषी विभागाच्या उपक्रमावर राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

राजू शेट्टी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राजू शेट्टींनी बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.

ठाकरे सरकारने कृषी मंत्री आणि खात्याच्या अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तो योग्य असेल पण त्यांना बांधावर जाऊन कळेल की शेतकऱ्यांचा किती आक्रोश आहे. त्यानंतरच त्यांचे डोळे उघडतील, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतमालाला भाव योग्यरित्या मिळाला पाहिजे. तेव्हाच शेतकरी आर्थिक अडचणीतून सुटतील, असंही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

-“शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं”

-चितळे उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे काळाच्या पडद्याआड

-कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक

-“दांडी मार्च ते दंडा मार! काँग्रेसने चांगलीच प्रगती केली”

-शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल