“RSS आणि भाजपकडे इतिहास नाही अन् भविष्यही नाही, म्हणूनच…”

वर्धा | बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता देशातील वातावरण स्वातंत्र्य चळवळीच्या मुद्द्यावरून तापलेलं दिसत आहे. कंगनाच्या टीकेनंतर आता भाजप नेते काँग्रेसवर टीका करत आहेत.

अशातच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि आयएसएसवर घणाघती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीच्या चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात नाना पटोले बोलत होते.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

त्यासाठीच ते खोटी माहिती पसरवून स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा आणि काँग्रेस नेत्यांची बदनामी करत आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध लढत होता त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने उभे असणारे आज लोकांना राष्ट्रवादाचे धडे देत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 60 वर्षापेक्षा जास्त काळ कधी तिरंगा फडकवला नाही ते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही म्हणत असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.

सत्तेचा गैरवापर करून देशाच्या स्वातंत्र्यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

सातत्याने खोटे बोलून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांवर खोट्या माहितीचा भडीमार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचे सुनियोजीत कारस्थान भाजप आणि संघाकडून सुरु आहे. हा खोटा प्रचार खोडून काढण्यासाठी काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण आपल्याला मिळाले आहे, असंही नानांनी म्हटलं आहे.

प्रशिक्षणातून घेतलेला विचार गावखेड्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व या देशातील लोकशाही आणि हुकुमशाही वाचवण्याची लढाई लढत आहोत, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशातील बंधुता व एकतेला नख लावणाऱ्या धर्मांध विचारांविरोधात आपली लढाई आहे. ही विचारांची लढाई अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी तुमच्यासारख्या प्रशिक्षीत कार्यकर्त्यांची गरज असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘बाबासाहेब मला नेहमी म्हणायचे…’; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

 “धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा”

‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला

  ‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण