आरोपीने जसा गुन्हा केलाय तशीच शिक्षा त्याला व्हायला हवी- रूपाली चाकणकर

मुंबई |  हिंगणघाट इथल्या प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रकार सोमवारी घडला. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. यावर जसा गुन्हा तशी शिक्षा व्हायला हवी, असं मत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे.

समाजाचं प्रबोधन गरजेचं आहे. न्यायालयात तात्काळ खटला चालावा. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी. Fast Track न्यायालयात त्वरीत निर्णय व्हावा. जगण्याचा,वावरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी, असं त्या म्हणाल्या आहेत.

महिला पीडितेचा न्यायालयात तात्काळ खटला चालावा. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा काहीतरी न्याय देण्याची मागणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या देखील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्या आहेत. सरकारने वाढत्या महिला अत्याचारावर तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, आपल्यातील भांडणं विसरून महिला सुरक्षेविषयी कठोर निर्णय घ्या- अमृता फडणवीस

-हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा न्याय द्या- प्रणिती शिंदे

-महात्मा गांधी काँग्रेससाठी ‘ट्रेलर’ असतील पण आमच्यासाठी ‘जीवन’- नरेंद्र मोदी

-“महाराष्ट्राच्या लोकांनी ज्यांना घरी बसवलं ते दिल्लीत जाऊन काय करणार?”

-सच्चा हिंदू मैदान सोडून कधीच पळत नाही; केजरीवालांची अमित शहांवर टीका