भारत-चीन संघर्ष, राजनाथ सिंग यांनी रशियाकडे केली ही महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली |  गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर आता दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत चीन कधीही आगळीक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने रशियाकडे महत्त्वाची मदत मागितली आहे.

परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील फायटर विमाने आणि भारतीय लष्कराच्या रणगाडयांसाठी सुट्टया भागांची आवश्यकता आहे. या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी राजनाथ सिंह रशियाकडे करणार आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

रशियाने आतापर्यंत संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं सहकार्य केलं आहे. आता भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने सध्याची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ विमानाने हे भाग पोहोचवण्याची भारताची मागणी आहे.

दरम्यान, भारताच्या ताफ्यातील बहुतेक शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्यामुळे यांच्या सुट्टया भागांसाठी भारताला रशियाची गरज लागते.

महत्वाच्या बातम्या-

-पाहा दहावी-बारावीचा निकाल कधी लागू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलंय!

-आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

-सामान्यांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?, सोमय्यांचा सरकारला सवाल

-खा. सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार जाहीर

-‘अ‌ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’चं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, शरद पवारांची विशेष फेसबुक पोस्ट