“त्या शेतातले आंबे खाणाऱ्यांना बुद्ध कळणार तरी कसा???”

मुंबई |  भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही तर विश्वाचा संसार चालवण्यासाठी संभाजी महाराजच पाहिजे, असं  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे.

शेतातील ते आंबे खाऊन तुम्हाला बुध्द कळणार कसा?? असा बोचरा वार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

हा मोदींचे गुरु आणि शिष्य मोदींमधील विषय असला तरी भीमा-कोरेगाव दंगलीच्या आरोपीकडून अशाच विचारांची अपेक्षा आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

भिडेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीसह काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. समता आणि बंधुत्वाची जगाला पहिल्यांदा ओळख करून देणारा महामानव कोण तर ते गौतम बुद्ध होते. दुर्दैवाने महाराष्ट्रात गोडसेंनंतर भिडे जन्माला आले आहे, बुद्ध समजायला बुद्धी लागते. कोणालाही बुद्ध समजत नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

महत्वाच्या बातम्या-