“भाजप नेत्यांकडे सत्तेतून पैसा आलाय; गोरगरीबांनी एवढा दंड कुठून भरावा??”

मुंबई :1 सप्टेंबरपासून सरकारने संपूर्ण देशात नव्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी केली. यानुसार, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 10 पट अधिक दंड आकारला जाणार आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

बहुसंख्य जनता ही गोरगरीब आहे. याचा सरकारला विसर पडला आहे. भाजपा नेत्यांकडे सत्तेतून पैसा गेला असेल पण सामान्य नागरिक मंदीच्या विळख्यात सापडले आहेत, असं म्हणत सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

गरीब रिक्षावाल्यांंना आणि टॅक्सीवाल्यांना इतका दंड भरणे कसं परवडेल? असा सवालही सावंत यांनी सरकारला विचारला आहे.

हजारो रुपयांचा दंड भरण्यासाठी सरकारने नवीन कर्जयोजना आणाव्यात. सरकारने जारी केलेल्या या नवीन नियमांवर टीका करत सचिन सावंत यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

दरम्यान, वाहतूक नियमांना अधिक कठोर केल्याने लोकांमध्ये याबाबत गांभीर्य वाढेल, लोक नियमांचं काटेकोरपणे पालन करतील, त्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं गडकरी यांनी सांगितलं.


महत्वाच्या बातम्या-