माझ्यापेक्षा सोमय्या अन् भांडारींची चिंता केली असती तर बरं झालं असतं; सावंतांचा पलटवार

मुंबई |  चंद्रकांतदादांनी माझ्या राजकीय भविष्याची चिंता केली हे ऐकून बरं वाटलं पण त्याआधी त्यांनी सरकारमध्ये असताना आपल्या दोन्ही बाजूला बसलेल्या दोघांच्या भविष्याची चिंता वेळीच केली असती तर त्यांनाही आणि मलाही आनंद झाला असता!, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील लगावला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ट्वीटला उत्तर देताना सचिन सावंत यांनी अजित पवारांनी भाजपाला व फडणवीस साहेबांना ‘मामु’ बनवले, असं म्हटलं होतं. सावंतांच्या याच विधानाचा पाटलांनी धागा पकडत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून सचिन सावंत गेले अनेक दिवस काम करत आहेत पण त्यांना काही मिळाले नाही, असा चिमटा काढला.

चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांच्यावर टीका केली. तसंच सचिन सावंत यांचं राजकीय भविष्य काय? असा सवालही विचारला. पाटील यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना सावंत यांनी माझी चिंता करू नका. योग्य वेळेला माधव भांडारी आणि किरीट सोमय्या यांची चिंता केली असती तर त्यांनाही आणि मलाही आनंद झाला असता, असं म्हटलं आहे.

आमची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. त्यांना काँग्रेसमध्ये इतकं वर्ष काम करून देखील काही मिळत नाही, हे त्यांनी पाहावं, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘गावासाठी जे मागाल ते सगळं देईन’!; तानाजी मालुसरेंच्या गावातून मुख्यमंत्र्यांची ग्वाही

-“नशीब 105 वर अडकले…. आता जर आम्हाला खेटले तर 15 पण निवडून येणार नाही”

-इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन नाही पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील

-वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकरांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात

-इंदुरीकर महाराजांनी लिहिलं आपल्या लाखो चाहत्यांना पत्र; पत्रात म्हणतात…