“जे फुटण्याच्या विचारात आहेत, त्यांनी उदयनराजेंना आठवावं”

मुंबई | जो कोणी फुटण्याचा विचार करत आहे त्याने उदयनराजे भोसले यांचा धडा घ्यावा, असा इशारा काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी  काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करत सध्याच्या राजकीय घडोमोडीवर भाष्य केलं आहे.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावरून सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप भारतीय राजकारणाला कलंक आहे. सत्तेसाठी अत्यंत हीन पातळीवर ते जाऊ शकतात, असा घणाघात  सचिन सावंत यांनी केला आहे.  तसेच ज्यांना नॅशनल करप्ट पार्टी म्हणताना ज्यांच्यावर रोख होता त्या भ्रष्टाचारी चेहऱ्यांबरोबर जायला लाज वाटली नाही का, असा सवाल सचिन सावंत यांनी अजित पवारांना केला आहे.

दरम्यान, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अजित पवारांवर  टीकास्त्र सोडलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-