“मोदींचं अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली जातीये”

मुंबई |  भारत-चीनच्या संघर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. देशाला खरं काय ते सांगा अशी मागणी करत नरेंद्र मोदी नव्हे तर हे सरेंडर मोदी आहेत, असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी, भाजपने केली आहे. मात्र भाजपच्या मागणीवर काँग्रेसने पलटवार करत नवा आरोप केला आहे.

राहुल गांधींनी माफी मागावी ही भाजपच्या नेत्यांची मागणी अत्यंत हास्यास्पद आहे. मोदी सरकारने चीनपुढे शरणागती पत्कारली, असा संदेश लोकांमध्ये गेला आहे. हे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या नेत्यांचा आटापिटा सुरु आहे, असं प्रत्युत्तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला दिलं आहे,

पाकिस्तान, नेपाळ किंवा चीनबाबतची मोदी सरकारची परराष्ट्र निती पूर्णपणे फोल ठरली आहे. ही गोष्ट लोकांना कळू नये, त्यासाठी भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी व त्यांच्या पक्षाने सैन्याची आणि संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली होती. तसंच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी देखील तशी मागणी केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसलेत, एक-दोन नगरमध्ये तर 2 तळकोकणात”

-गुडन्यूज… भारतात कोरोनावरच्या या औषधाला परवानगी, औषध गेमचेंजर ठरण्याची शक्यता!