“हर्बल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा”

मुंबई | महाराष्ट्रात आता लवकर दारू स्वस्त होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने आता राज्यात दारू स्वस्त होणार आहे.

राज्य सरकारने आयात केलेल्या स्काॅच व्हिस्कीवरील किंमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दारूची किंमत आता इतर राज्यांच्या किंमतींऐवढी झाल्याचं दिसतंय.

स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन खर्च 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भात अधिसुचना गुरूवारी जारी करण्यात आली आहे.

राज्यात दारूची किंमत जास्त असल्याने इतर राज्यातून दारू तस्करी होत असल्याचा प्रकार वारंवार समोर येत होता. अशा प्रकारांना आता आळा बसण्याची शक्यता आहे.

राज्यात आयात करण्यात येणाऱ्या स्काॅचच्या विक्रीतून राज्य सरकारला दरवर्षी 100 कोटी रूपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या महसूलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

व्हिस्कीच्या किंमतीत घट झाल्याने आता राज्यात व्हिस्कीचा व्यापार वाढण्याची शक्यता आहे. तब्बल अडीचशे पटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी कमी केली. हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा, असा महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार सुरु आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

एक्साइज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम हातात घेतले आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“जे एअर इंडिया, रेल्वे विकतात, त्यांनी एसटीवर बोलू नये” 

शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश 

33 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनी केंद्राला झुकवलं 

मोठी बातमी! मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार 

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी