“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

मुंबई |  राजबिंडा चेहरा, अगदी प्रसन्न वाटणारं व्यक्तीमत्व आणि अभिनयात निपुन असलेला सुशांत… त्याने अवघ्या 34 व्या वर्षी जगाला रामराम ठोकत पुढच्या प्रवासाला तो निघून गेला. त्याच्या निधनाने बॉलिवूडमध्ये सन्नाटा पसरलाय. अशातच सुशांतबद्दल आता नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ट्विट करत धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

‘छिछोरे’ चित्रपट सुपरहिट ठरल्यावंतर सुशांत सिंग राजपूतने 7 फिल्म साईन केल्या होत्या. सहा महिन्यात त्याच्या हातातून सगळ्या फिल्म काढून घेण्यात आल्या, अशी धक्कादायक माहिती समोर आणल्यानंतर निरूपम यांनी या फिल्म सुशांतकडून का काढून घेण्यात आल्या, त्याचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

फिल्म इंडस्ट्रीतली निष्ठुरता एका वेगळ्या लेव्हलला काम करते. याच निष्ठुरतेने एका प्रतिभावान कलाकाराचा जीव घेतला आहे, असा खळबळजनक आरोप संजय निरूपम यांनी केला आहे.

 

 

दुसरीकडे सुशांतच्या नातेवाईकांनी देखील सुशांतच्या आत्महत्येबद्दल सविस्तर आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. आमचा सुशांत खूप शांत, सुस्वभावी आणि मनमिळावू होता. तो अशा प्रकारचं पाऊल उचलणं शक्य नाही. यापाठीमागे मोठा कट आहे, असा गंभीर आरोप सुशांतच्या मामाने केला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी रात्री ट्विट करत ते याप्रकरणी बोलताना म्हणाले, “सुशांतच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी मुंबई पोलिस करतील. यापाठीमागचे सगळे धागेदोरे तपासले जातील. बॉलिवूडमधील वैमनस्य तसंच कुणी प्रतिस्पर्धी सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार आहेत का? याचीही चौकशी केली जाईल”.

महत्वाच्या बातम्या-

-सामनातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता संजय राऊत म्हणतात…

-…त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, सामनाचा आताचा अर्धवट अग्रलेख; थोरातांची टीका

-सरकारनं सांगितलं कोरोनाची ‘ही’ दोन लक्षणं दिसली; तर टेस्ट करुनच घ्या!

-सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट होतेय व्हायरल