“आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून देशावर असलेलं आर्थिक महासंकट सुटेल का?”

मुंबई | स्वातंत्र्यदिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्यावर ध्वजारोहन केल्यावर जवळजवळ 90 मिनिट भाषण केलं. मोदींनी केलेल्या त्या भाषणावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काही मुद्यांवरून मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाच्या महामारीने देशासमोर आलेलं आर्थिक महासंकट त्याचं काय?, आत्तापर्यंत देशात 14 कोटी जणांनी आपला रोजगार गमावला आहे. जनतेला बाहेर पडायचं आहे मात्र त्यांनी बाहेर पडल्यावर करायचं काय?, त्यामुळे आत्मनिर्भर बनण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

देशांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं सामर्थ्य भारतात असल्याचं म्हटलं होतं. यावर जगाचं राहूद्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, स्वातंत्र्य दिवस येतो आणि जातो मात्र लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दु:ख तेच आहे, अशा शब्दात अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचं सोपस्कार त्यांनी पार पाडलं. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अजुनही आपल्या भूमीत घुसलेलाच आहे आणि पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कढीपत्त्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?’ जाणून घ्या बहुगुणी कढीपत्ता खाण्याचे फायदे!~

पार्थ पवारांनंतर आता रोहित पवारांनी केली ही मागणी; पुन्हा चर्चेला उधाण

पार्थ पवार काही भाजपमध्ये येत नाही आणि आम्हीपण काही घेत नाही- गिरीश बापट

भारतीय टीममधील माजी क्रिकेटर आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील ‘या’ मंत्र्याची जीवनयात्रा अखेर थांबली

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती