सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर छत्रपती संभाजी म्हणतात…

मुंबई : महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे. त्यावर खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे हे गडकिल्ले! महाराजांचा चरणस्पर्श झालेला प्रत्येक किल्ला आम्हाला पवित्र आहे, असं संभाजी भोसलेंनी ट्वीट केलं आहे.

गडांचे जतन-संवर्धन केले तर संपूर्ण जगभरातून हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी लोक येतील यातून स्थानिकांना रोजगार मिळेलच पण त्याचबरोबर समृद्ध वारसा जपण्याचे समाधान सुध्दा मिळेल, असं म्हणत संभाजींनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं जतन होण्याऐवजी त्यांचं हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे. राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनीही ट्विटरवरुन चिड व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-