मराठा मोर्चात भगव्या टोप्या घालणारे गप्प का?; ‘सारथी’ प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक

पुणे | राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवविकास संस्था ही संस्था राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे बंद पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या संस्थेबाबत एवढं काही घडत असताना मराठा क्रांती मोर्चात टोप्या आणि भगवे झेंडे घेऊन फिरणारे नेते याविषयी गप्प का?, असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.

मराठा क्रांती मोर्चात टोप्या आणि भगवे झेंडे घेऊन फिरणाऱ्यांच्या विरोधात आता मोहिम उघडणार आहे, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी याबाबत निवेदन जारी केलं आहे.

मराठा, कुणबी समाजातील तरुणांना संशोधन आणि स्पर्धा परिक्षांच्या प्रशिक्षणाची संधी या संस्थेमुळे मिळू लागली. ही संस्था उभी राहू लागल्यानंतर राज्य सरकारने त्यांना मिळणारी मदत रोखली, असं प्रशांत धुमाळ म्हणाले आहेत.

प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी ही संस्था बंद करण्याचा घाट घालून मराठा, कुणबी समाजाला उपेक्षित ठेवण्याचा डाव आखला आहे, असा आरोपही धुमाळांनी केला आहे.

दरम्यान, संस्था बंद पडू नये, याबद्दल मराठा समाजातील नेत्यांनी काम केलं पाहिजे, मराठा क्रांती मोर्चात येणारा एकही नेता याविषयी बोलत नाही. विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. त्यातही कुणी ‘सारथी’बद्दल चर्चा घडवून आणलेली नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आता रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं जाईल, असंही धुमाळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-