‘जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच’; मनसेचा शिवसेनेला इशारा

मुंबई | मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसचा फोटो ट्विट करत असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

संदीप देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

महापालिकेच्या भ्रष्टाचारात बरेचसे लोक भरेडले जात आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने मृतदेह बॅग्स खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. या बॅग्सची किंमत काय ते महापालिकेने ठरवावं. पण कमी गुणवत्तेच्या बॅग्स घेऊन मंबईकरांच्या जीवाशी खेळू नये, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

 

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

-शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात

-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

-राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती