नवी दिल्ली | राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या शपथविधीला आता महिना होत आला तरी त्यांचे खातेवाटप झाले नाही.
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आतापर्यंत पाच वेळा दिल्ली दौरा केला. तरी अद्याप दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठी आणि त्यांचे संगनमत होत नाही. त्यावरुन आता शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यात जर पुन्हा सत्तांतर झाले, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही, असे सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केले. शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना भावनिक आव्हाने करुन शिंदे यांनी पळविले, असे देखील राऊत म्हणाले.
याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांवर भाष्य केले. इतक्या वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येत आहेत, ते दिल्लीतच स्थायिक होणार आहेत की काय? असे मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाटत असल्याचे राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संवाद साधला. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) संविधानाची सीमा ओलांडून निर्णय देणार नाही, अशी मला आशा आहे, असे राऊत म्हणाले. तसेच 16 आमदार अपात्र ठरतील आणि त्यांना दुसऱ्या पक्षात सामील व्हावे लागेल असे देखील राऊत म्हणाले.
शिवसेनेला सोडून दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची अनेक आमदारांची तयारी नसल्याने आणि अनेकजन आमच्या संपर्कात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतर ते आमच्या पक्षात परत येतील, असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात दोन लोकांचे कॅबिनेट असून दोन लोकच सरकार चालवत आहेत. त्याचा परिणाम जनतेवर होत आहे. त्यामुळे दोन नेत्यांच्या मंत्रीमंडळातून शिंदे गटाला आणि राज्याच्या जनतेला काय मिळत आहे? हा संशोधनाचा विषय आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या –
“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?”
‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”