“ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत, मेरा आंगण मेरा रणांगण”

मुंबई |  शिवसेा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपने आज पुकारलेल्या मेरा आंगण मेरा रणांगण या सरकारविरोधी आंदोलनावर सडकून टीका केली आहे. ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत मेरा आंगण मेरा रणांगण, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर ताणतणावामुळे परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ‘मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?’ या सगळय़ाचे वैफल्य येणे साहजिकच आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शात आरोग्यविषयक आणीबाणी आहे. महाराष्ट्र सरकार ‘केरळ मॉडेल’चा मार्ग न स्वीकारता पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्याशी समन्वय साधून काम करीत आहे, कोरोना युद्धाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडेच आहे व राहील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे जर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पचनी पडत नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे, असंही राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सूचनेवरून पाटील-फडणवीस मंडळ महाराष्ट्रात स्वत:चेच तोंड काळे करण्याचे आंदोलन करीत आहेत असे वाटत नाही. ही आंदोलनाची मूळव्याध त्यांची त्यांनाच उपटलेली दिसते. प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा असे सांगण्याची वेळ आली आहे, असा प्रतिवारही त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

-लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन

-“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

-आत्तापर्यंत 30 लाख मजूर स्पेशल ट्रेन्सनी आपापल्या घरी पोहोचवले- पीयूष गोयल

-कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत