20 जवानांना मारलं तरी आणखी डिवचायचं राहिलंय काय?, सामनातून आज पुन्हा एकदा मोदींवर टीकेची झोड

मुंबई |  आज पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 20 जवानांना मारलं तरी आणखी डिवचायचं राहिलंय काय?, असा सवाल करत पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनावर टीका करण्यात आली आहे.

जर आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ, भारत एक एक इंच जमिनीचे संरक्षण करेल. डिवचल्यास उत्तर देऊ, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. मात्र 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय?, असा सवाल आजच्या सामनातून विचारण्यात आला आहे.

इतर स्वाभिमानी देश, एका जवानावर हल्ला झाला तरी देशाच्या स्वाभिमानावर हल्ला झाला असे समजून बदला घेतात. तेव्हा आपल्या 20 जवानांना चिन्यांनी ठार केले हे डिवचणेच आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

चीनने भारताच्या स्वाभिमान आणि अखंडतेवर सगळ्यात मोठा हल्ला केला आहे. 20 जवानांच्या शवपेट्या देशात येणे ही काही स्वाभिमान किंवा गौरवाची गोष्ट नाही, असंही सामनामधून सुनावण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चिंता वाढली… पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

-प्रभू रामचंद्रांचा चीनी ड्रॅगनवर निशाणा; ‘या’ देशातील वेबसाईटवर झळकला फोटो!

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांची केंद्राकडे ‘ही’ विशेष मागणी, केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष

-राज्य सरकारच्या खात्यात जमा झाले एकाच दिवशी तब्बल 6500 कोटी, कसे ते बघा…

-दररोज किती परप्रांतीय महाराष्ट्रात येतात? गृहमंत्र्यांनी सांगितला आकडा