संजय राऊत यांच्या अग्रलेखाची इतिहासात नोंद होईल- काँग्रेस

मुंबई |  कोरोनाबाबतची राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांचे कोरोनाबाबतचे विचार तसंच सत्ताधारी पक्षावर टीका न करता संयमाने दिल्या जाणाऱ्या सूचना तसंच लॉकडाऊन संपल्यानंतरच्या राहुल यांनी सांगितलेल्या उपाययोजना तसंच केलेलं मार्गदर्शन याविषयी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यावर संजय राऊत यांच्या अग्रलेखाची इतिहासात नोंद होईल, असं काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी म्हटलं आहे.

कुठल्याही ‘सत्याला’ तीन टप्प्यातून जावं लागतं, प्रथम थट्टा होते, मग विरोध होतो, मग पुढे नाईलाजाने ते स्वीकारावे लागते. राहुल गांधी ह्यांना कायमच ह्याला सामोरं जावं लागलं आहे. संजय राऊत ह्यांच्या सरकारला जागं करणाऱ्या अग्रलेखाची इतिहासात नोंद होईल!, असं सातव म्हणाले आहेत.

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी यांनी आज सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधी यांच्या दुरदृष्टीचं कौतुक करत केंद्रातील सत्ताधारी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू ‘चिंतन शिबीर’च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल. कोरोनाबाबतचे राहुल गांधी यांचे विचार देशहिताचे आहेत. त्यांचे विचार देशभरात पोहचवायला हवेत, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे.

राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते तेव्हा राहुल गांधी कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“20 तारखेपासून मोजके उद्योग-व्यवसाय सुरू होणार मात्र अटी शर्थी पाळाव्या लागणार”

-उसतोड कामगारांचा घरी परतण्याचा मार्ग कुणी मोकळा केला?; मनसे अन् धनंजय मुंडेंमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू!

-“राहुल गांधी जेव्हा कोरोनाचा धोका सांगत होते तेव्हा भाजप म.प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यात व्यस्त होते”

-माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा – संजय राऊत

-मरकजला दिल्ली पोलिसांनी परवानगी कशी काय दिली? स्वरा भास्करचा बबिता फोगटला सवाल