मी चाणक्य नाही तर शिवसेनेचा योद्धा- संजय राऊत

मुंबई |  मी चाणक्य नाही मी योद्धा आहे, शिवसेनेचा योद्धा. चाणक्य वगैरे खूप मोठं होते, माझं काम फक्त लढणं आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुम्ही महाविकास आघाडीची सत्ता येण्यात चाणक्याची भूमिका बजावली आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी केला होता. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. मला फक्त लढणं माहित आहे. मी शिवसेनेचा योद्धा आहे, असं ते म्हणाले आहेत.

मी माझं काम केलेलं आहे. त्यामुळे माझी जबाबदारी संपली. आता मी माझ्या कामाला लागेन. उद्या पासून पत्रकार परिषदाही होणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मी दिल्लीत काम करु, असं ते म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, गेल्या एक महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी संजय राऊतांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं चित्र आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-