मुंबई | महाराष्ट्रावरचा अन्याय जर विरोधी पक्षाला दिसत नसेल तर महाराष्ट्राचं राजकारण करण्यास ते नालायक आहेत. मग ते कुणीही असोत मला त्यांचं नाव घ्यायचं नाही, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर टीकेची तोफ डागली. पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
इतिहासात मला आज असा विरोधी पक्ष दिसतोय की जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाहीये. महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायायंच ते समर्थन करतायेत. असा विरोधी पक्ष मला महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसतोय, असं राऊत म्हणाले.
मुंबईत होणारं आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र गुजरातला हलवण्याच्या केंद्राच्या निर्णयावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. जर त्यांना आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र मुंबईमध्ये नको होतं तर त्यांनी बिहारला का नेलं नाही? उत्तर प्रदेशला का नेलं नाही. खरं तर पंतप्रधान मोदींना पक्षीय राजकारणात पडणारा पंतप्रधान नाही, हे दाखवण्याची संधी होती, पण त्यांनी ती घालवली असल्याचं राऊत म्हणाले.
केंद्राला जाणाऱ्या सीएसआर फंडावरून देखील राऊत यांनी राज्यातील विरोधी पक्षाला चांगलेच कान टोचले. खरंतर विरोधी पक्षाला एक नामी संधी होती की त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तुटून पडायाला पाहिजे होतं की तुम्ही महाराष्ट्राला मिळणारा निधी केंद्राला जाऊ कसा दिला? जरी आमचं सरकार असेल तरी मी विरोधी पक्षाच्या बाजूने सांगतोय की त्यांनी हे करायला पाहिजे होतं. पण त्यांना महारष्ट्रावरचा अन्याय दिसतो कुठे? अशी टीका राऊत यांनी केली.
महाराष्ट्रातील जे नेते केंद्रात आहेत किमान त्यांनी तरी महाराष्ट्रावरचा अन्याय सहन करता कामा नये. तुम्हाला मत व्यक्त करायची भिती वाटते का? गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनीतरी याविषयी बोलायला पाहिजे. आपलं मत व्यक्त करायला पाहिजे. जर अन्याय हा शब्द तुम्हाला खटकत असेल तर महाराष्ट्राचं नुकसान झालं किमान एवढं तरी म्हणा, असंही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत ‘या’ अभिनेत्यासोबत पार पडला अरूण गवळीच्या लेकीचा लग्नसोहळा
-“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”
-दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना
-पतीची कामगिरी खराब झाली तरी दोष पत्नीवरच येतो- सानिया मिर्झा
-खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील