“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”

मुंबई | केंद्राने बुधवारी घोषणा केली की 4 नोव्हेंबरपासून पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलसाठी 10 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी होईल. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपला फटका बसल्यामुळेच मोदी सरकारने हा निर्णय घेतला. मात्र देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

देशातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटेल, असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्ट द्यायचीच होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

मुळात केंद्र सरकारला दिवाळी गिफ्ट द्यायचं होतं तर मग सामान्य जनतेचा रिकामा खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील अशा पद्धतीने इंधन स्वस्त करायला हवं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.

तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखवलेली नाही. दिलं पण हात आखडता ठेवून दिलं असंच इंधन दरकपातीबाबत म्हणता येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

गेल्या एक-दीड वर्षात जी ‘न भूतो’ इंधन दरवाढ झाली त्या माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत लाखो-कोटींची भर पडली आहे. तशी ही जनतेची केलेली लूटच आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

सामान्य माणसाला दिलासा द्यायचाच होता तर तो समाधानकारक द्यायचा होता. ती संधी केंद्र सरकारने गमावली, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट; ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ 

“फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं” 

“नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं”

“रवी शास्त्री 24 तास नशेत असतात”; आरोपांनी भारतीय टीममध्ये मोठी खळबळ

मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त