…तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का?- संजय राऊत

मुंबई | वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सुरतमध्ये जाळपोळीसारखा भयंकर प्रकार घडला. मात्र त्यावर विरोधकांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवली जात आहे. हे सर्व ठरवून सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटात चांगलं काम करतायत याचं अनेकांना दु:ख होत आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये उद्रेक घडवून हे राज्य अस्थिर आणि खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या –

-SBI कडून ग्राहकांसाठी खुशखबर; कोणत्याही एटीएममधून कितीही वेळा पैसे काढा

-लोकांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून ‘हे’ करा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

-“ही वेळ राजकारणाची नाही, निवडणुका लागल्यावर राजकारण करता येईल”

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना विनंती करतो, महाराष्ट्रात लष्कराच पाचारण करा”

-आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही- राहुल गांधी