“नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू आणि जिंकू कारण….”

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या कारवाईवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष वाढलेला असताना आता राज्यासह देशात खळबळ माजवणारी कारवाई ईडीनं केली आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ईडीनं मनी लाॅड्रिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला अटक केल्यानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जोरदार वाद रंगला आहे. केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचं काम करत आहे. आम्ही झुकणार नाहीत, असा एकंदरीत सुर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांची पाठराखण केली होती. आता संजय राऊत मलिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे ठाकले आहेत.

महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत, चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, असा सल्लाही राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. आम्ही लढत राहू आणि जिंकू, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला आहे. परिणामी राज्यात जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे.

कंस आणि रावण सुध्दा मारले गेले. हेच हिंदुत्व आहे, जय महाराष्ट्र, असं म्हणत राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. राऊत यांनी हिंदूत्वाची आठवण काढत भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीमधील सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे. परिणामी राज्यात कसल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

पाहा ट्विट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 भंगारचा व्यवसाय ते मातब्बर मंत्री! नवाब मलिकांकडे आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

“कमळाबाई लाविते काडी, पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना राष्ट्रवादीचा रांगडा गडी”