“राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करतात”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

कॅबिनेटमधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं आहे. राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे, असं वाटतं का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता, असं सरकारचं म्हणणं नसून महाराष्ट्राचं म्हणणं आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत. हे या राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही, असा टोला संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारींना लगावला आहे.

या देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे हे मी वारंवार सांगतोय, अशा प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय लोकांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना नाव न घेता लगावला.

अधिवेशनात काम होत नाही. त्याला जबाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नावर आणि विकासावर कामकाज व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. पण विरोधी पक्ष ते होऊ देत नाही. काल मी मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घ चर्चा केली, असंही राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं.

ठाकरे सरकारला काम करू द्यायचे नाही ही विरोधकांची भूमिका दिसतेय. याला लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. ठिक आहे, जनता पाहत आहे, असंही राऊत म्हणाले.

मुंबईत अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून कोणतंही दहशतीचं वातावरण नाही. तुम्ही दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या राज्यातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

नितेश राणेंच्या नव्या ट्विटने चर्चांना उधाण, म्हणाले… 

मोठी बातमी! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबाबत रशियन मीडियाचा खळबळजनक दावा! 

फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर, रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या 

पुणेकरांनो काळजी घ्या; गेल्या 24 तासातील रूग्णांच्या आकडेवारीने टेंशन वाढवलं 

मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला मोठा निर्णय!