‘बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून, तुम्ही त्यांना आपले म्हणाल पण…’, संजय राऊत कडाडले

मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज कार्यकर्ता मेळाव्या त्यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा फैलावर घेतलं. 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही. 50 खोके पचणार नाहीत. शिवसेना आमच्या बापाचीच आहे. तुम्हाला शिवसेनेशी बेइमानी करणं पचणार नाही, असं म्हणत राऊतांनी बंडखोर आमदारांना सुनावलं आहे.

शिवसेना आमच्या बापाचीच आहे. शिवसेनेशी बेइमानी करणं पचणार नाही. सेना मेळाव्यात 50 खोकेवाले नाहीत. हा वाद खरा खोटा नव्हे तर इमान आणि बेईमानीचा आहे. तसेच शिवसेना सोडली हे शिंदे गटातील आमदारांनी सांगावं. बंड करण्यामागचं खरं कारण सांगावं, असा सवाल राऊतांनी केला. तसेच बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून. तुम्ही त्यांना आपले म्हणाल पण ते आशीर्वाद देणार नाही, असंही राऊत म्हणाले.

शिवसेना फोडण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, आम्ही लाल किल्ल्याला सलाम करत नाही, आम्ही मराठी माणसं रायगडाला सलाम करतो, असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

आमदार का फुटले आता खरी कारणं लक्षात येऊ लागली आहेत. नगरपंचायतीत निवडून न येणाऱ्यांना सेनेने मंत्री केलं. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाला झटका 

अमरनाथमधील ढगफुटीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर! 

‘गप्प बसून आराम करा’; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला 

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक मोठा दणका!

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी; निवडणूक आयोगाने केली महत्त्वाची घोषणा