भिडेंच्या सांगली ‘बंद’ला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराजांच्या वंशजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी भिडेंच्या सांगली बंदला प्रत्युत्तर दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली. याचा निषेध म्हणून सांगली बंदची हाक दिली असती तर महाराष्ट्राला आनंद झाला, असं ट्विट करत राऊत यांनी भिडेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

छान आनंद आहे. चालायचचं. आपल्या विषयी आदर आहे आणि राहील, असंही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर भूमिका मांडताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती.

दरम्यान, संजय राऊत यांनी वागताना आणि बोलताना तारतम्य राखावं. समाजस्वास्थ्य बिघडेल अशी तुलना करू नये. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती त्यांनी राऊत यांना लवकरात लवकर पदावरून हटवाव. आमचा बंड हा शिवसेनेच्या विरोधात नाही, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-