“यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तान अन् धर्म-जातीवादाची प्यादी बंद करून आर्थिक प्रश्नावर काम केलं पाहिजे”

मुंबई | हिंदुस्थानात यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून कोरोनाच्या संकटानंतर देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा.देश पाठीशी उभा राहील. असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी यावर दीर्घ भाष्य केलं आहे.

राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉक डाऊन अवस्थेत गोरगरीब भरडला गेला आहे. त्याचे भविष्य अधांतरी आहे. गोरगरीबांना मदत करण्यासाठी सरकारने 65 हजार कोटी रुपये खर्च करणे आवश्यक असल्याचे मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे मत, त्यांनी केलेल्या चर्चा याची खिल्ली उडवता येणार नाही, असं राऊत यांनी आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्राला सांगितलं आहे.

कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून बाहेर कसे पडावे? अर्थव्यवस्था खुली करण्याचे मार्ग कोणते? इत्यादी मुद्यांवर गांधी यांनी चर्चा केली. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे अमर्याद काळापर्यंत लॉक डाऊन चालू ठेवणे अर्थव्यवस्थेला महागात पडेल. सरकारला नियमांच्या चौकटी मोडून काम करावे लागेल व सत्ता, निर्णयाचे अधिकार आज आहेत तसे एका दोघांच्याच मुठीत न ठेवता त्याकडे सामुदायिक पद्धतीने पाहावे लागेल,असा टोलाही त्यांनी मोदी-शहांना लगावला.

भाषणे, आश्वासने यांना मर्यादा पडतात व लोकांच्या पोटातली आग त्यावर हल्ला करते. लोकांनी संयम पाळायचा हे ठीक, पण सरकारला गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या देखील बदलत्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागेल व दुसऱ्यांचे देखील ऐकावे लागेल, असा टोला त्यांनी केंद्राला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-किम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर!

-राज्य सरकारचं कितीही चांगलं चित्र भासवलं तरी मला ते दिसत नाही- राज ठाकरे

-“रजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या? असं कसं चालेल”

-लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?

-तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? वाचा संपूर्ण यादी