मुंबई | 2019 साली महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप करत महाविकास आघाडी सत्तेत आली. शिवसेनेनं आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय घेत भाजपला सत्तेपासून दूर सारलं होतं.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठ्या सत्तासंघर्षाला सुरूवात झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदी सरकार राज्य सरकारला त्रास देत असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना आणि महाविकास आघाडी भाजपच्या त्रासाला समर्थपणे तोंड देत आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. महापालिका निवडणुका समोर ठेऊन कारवाई करत असाल तर बुमरॅंग होईल, असंही राऊत म्हणाले.
राज्यात सक्तवसूली संचनालयाकडून कारवाई केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी भाजप सरकारला घेरलं आहे. मोदी सरकार राज्य सरकारला त्रास देण्याचं काम करत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रात ईडीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केलाय. मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांनी पैसा वसूल केला आहे. परिणामी मुंबई पोलीस आता या प्रकरणात चौकशी करणार आहेत, असं राऊत म्हणाले.
मुंबई पोलीस आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये आता चांगलीच कायदेशीर लढाई चालू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलीस खात्यामध्ये नवा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता राज्यात निर्माण झाली आहे.
ईडीचा देशातील सर्वात मोठा घोटाळा लवकरच उघड होणार आहे, असं राऊत म्हणाले आहेत. ईडीकडून राज्य सरकारच्या नेत्यांवर गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्यानं राज्यात मोठा वाद उद्भवला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार राज्याला बरबाद करण्याचं काम करत असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन”, राऊतांचा हल्लाबोल
Maruti Suzuki Dzire CNG भारतीय बाजारात दाखल, मायलेज तर विचारूच नका…; पाहा किंमत
Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट
शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाची धाड!