अक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण

पुणे | मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडेला झालेल्या मारहाणीनंतर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. अक्षय बोऱ्हाडेनं केलेले मारहाणीचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.

अक्षय बोऱ्हाडे घरी मनोरुग्ण आणत असतात. त्यातच एका कोरोनासदृश्य रूग्णाला पुण्याला सोडण्याबाबत त्यांना कळवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्याला बोलावले. त्यावेळी त्याला रुग्णांचा सांभाळ व्यवस्थित करण्याबाबत सांगितले. तसेच काळजी घेण्याबाबत सांगीतले, कारण ते रूग्ण मनोरूग्ण असल्याने गावात इतरत्र फिरत असतात.

मात्र बोऱ्हाडे यांना ते आक्षेपार्ह वाटत असल्याने त्याने तिथे आमच्यासोबत अरेरावीची भाषा केली. आम्हाला शिवीगाळ केली. नंतर त्याने स्वत:च मारहाणीचा आरोप करत, तो व्हिडिओ बनवला आहे, असं सत्यशील शेरकर यांनी म्हटलं आहे.

अक्षय बोऱ्हाडेने त्याच्या घरी मनोरुग्णांना आणलेले आहे. ते सुमारे ४० ते ४५ रुग्ण असून, त्यांची कुठल्याही प्रकारची चेकिंग केलेली नाहीये. तसेच ते मनोरुग्ण असल्याने कधीही बाहेर पडताय, असंही सत्यशील शेरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपले आरोप चुकीचे वाटत असतील तर सत्यशील शेरकर यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा, असं अक्षय बोऱ्हाडेनं म्हटलं आहे.

खासदार उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट-

अक्षय बोऱ्हाडेचा व्हिडीओ-

 

महत्वाच्या बातम्या-

-खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

-“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”

-मराठी युवकांकडे कौशल्य नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

-फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

-…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब