मोठी बातमी! अतिवृष्टीमुळे ‘या’ दोन शहरांमधील शाळा बंद

मुंबई | अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत.

शाळकरी मुलांना पावसामुळे आणि वाहतुक कोंडीमुळे शाळेत जाण्यात त्रास होत आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरेसुद्धा जावं लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना देखील घडत आहे. शाळकरी मुलांची सुरक्षा लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाध्यावर चांगला पाऊस झाल्याने शहराजवळील चारही धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पीक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

असाच पाऊस सुरु राहिला तर पीक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय, 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर 

राष्ट्राध्यक्ष फरार, नागरिक रस्त्यावर; श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

‘औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय संभाजीमहाराजांच्या प्रेमापोटी नाही तर..’, इम्तियाज जलील आक्रमक

‘शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा होत होता’, बंडखोर आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

“राजनाथ सिंहांना मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून उद्धव ठाकरेंना लागला”