पाहा काय आहे पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. परंतू आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचं बोललं जात आहे.

सोमवार म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 35 पैशांची वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 102.52 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 115.73 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 105.84 रूपये आहे आणि डिझेलचा दर 94.57 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

कॉलेज येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरू, वाचा काय आहे सरकारची निमावली

सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचे दर

लसीकरणाच्या निर्बंधाबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती म्हणाले…

हिंदू मुलाबरोबर फिरल्यामुळं तरूणीसोबत केला ‘या’ प्रकारचा गैरव्यवहार, पाहा व्हायरल व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ