शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची शक्यता; पडळकरांवर कारवाईचा इशारा

सातारा |  “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकरांनी पवारांवर जहरी टीका केली. पडळकरांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तिव्र शब्दात निषेध केला जात आहे. मात्र पडळकरांवर आता कडक कारवाई केली जाईल. असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप तपासण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले असून तपासात काही आक्षेपार्ह विधानं आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. असं देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

पडळकरांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादी पडळकरांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत आहेत. तर भाजप नेत्यांनी ही पडळकरांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत हात वर केले आहेत.

दरम्यान, बारामती विधानसभा निवडणूकीपासून पवार विरुद्ध पडळकर हा वाद विकोपाला गेला. आता पडळकरांच्या आक्षेपार्ह विधानानंतर पुन्हा नव्यानं या वादाला तोंड फुटलं आहे.

 

-इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!

-राष्ट्रवादीत ‘या’ पदासाठी निवडणूक होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज