शरद पवारांनी नाशिक दौरा रद्द करून उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक!

नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नाशिक दौरा अचानक रद्द केला आहे. नाशिक दौरा रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय. उद्या शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची महत्वाची बैठक बौलावली आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातले मतभेद समोर येत आहेत. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंत्र्यांची बेठक बोलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. मात्र शरद पवार यांनी हा दौरा अचानक रद्द केला आहे.

दरम्यान, एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे विषय वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देणं म्हणजे त्यांना काही गोष्टी लपवाच्या झाकायच्या आहेत, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-इंदुरीकरांसह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करा; तृप्ती देसाई थेट गृहमंत्र्यांच्या भेटीला

-“आता मी महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”

-शिवसेनेच्या शाखाप्रमुखासारखं काम केलं तर विजय आपलाच!- शरद पवार

-हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावून दाखवा; फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान.

-भाजप ही हारलेली नाही तर जिंकलेली टीम आहे- देवेंद्र फडणवीस