…तर लॉकडाऊनच्या काळात यत्किंचितही वाढ करावी लागणार नाही – शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याअगोदर तीन वेळा त्यांनी महाराष्ट्राला संबोधित केलं होतं. आज ते चौथ्यांदा संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी आपण पुढचे 12 दिवस काळजी घेतली, लॉकडाऊनच्या काळात यत्किंचितही वाढ करावी लागणार नाही, असं ते म्हणाले.

अमेरिकेसारखा आरोग्य आणि संसाधनांची उत्तम स्थिती असलेला देश, पण तिथे ‘कोरोना’मुळे मृत्यू पडलेल्या नागरिकांची संख्या ४० हजारावर, तिथे अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. परंतू भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याकडे परिस्थिती बरी असल्याचं ते म्हणाले.

केंद्राची नियमावली पाळणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये. पाश्चिमात्य देशांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे लोकांनी त्यातून धडा घेणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, पाश्चिमात्य देशांशी महाराष्ट्राची तुलना करणं योग्य नाही. दोन व्यक्तींमध्ये पुरेसं अंतर ठेवणं गरजेचं असल्याचा पुनरूच्चार पवार यांनी केला. तसंच मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये घरातच नमाज पठन करावं – शरद पवार

-महाराष्ट्रात कोणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही- सुप्रिया सुळे

-मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्जवरीलवर जीएसटी लादणं चुकीचं आहे- राहुल गांधी

-“अफवा आणि गैरसमज कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात याच उदाहरण म्हणजे पालघरची घटना”

-योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं निधन; लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय