शेतकऱ्यांच्या मदतीला शरद पवार धावले; केंद्रीय मंत्र्यांकडे केली विनंती

नागपूर |  कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धावून गेले आहेत.

केंद्रिय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना शरद पवार यांनी विनंती केली आहे. कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्याने नागपूर, चंद्रपूर भांडारा आणि इतर जिल्ह्यांत धान खरेदीची मुदत 4 ते 5 आठवड्यांची मुदत वाढवावी, अशी मागणी त्यांनी पासवान यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे राज्यातील एपीएमसी मार्केट देखील बंद ठेवण्यात आलेले आहे. दुसरीकडे काही ठिकाणी भाज्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडताना पाहायला मिळत आहे. मात्र नागरिकांनी अधिकची गर्दी केल्यास विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या विनंतीनंतर केंद्रिय मंत्री पासवान काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-“हे ही दिवस जातील… माणुसकी आणि नैतिकता सोडू नका”

-महाराष्ट्रातले 15 कोरोना पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत; आरोग्य यंत्रणेला मोठं यश

-“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

-शहरातून गावाकडे पळणाऱ्यांना संजय राऊत यांचा सोप्या शब्दात खास सल्ला!

-‘कोरोना रोखण्यासाठी भारताने घेतलेले निर्णय योग्यच’; WHO कडून भारताचं कौतुक