आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता- शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्विकारावं, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली. उद्धव ठाकरे यांची महाविकासआघाडीच्या नेतेपदी निवड झाली आहे. उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी भावना व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर कश्या प्रकारे टीका केलीये हे सगळ्या देशाने पाहिलंय. पण वैयक्तिक सलोख्यात आम्ही कधी अडथळा येऊ दिला नाही. शरद पवारांनी यावेळी मिनाताई ठाकरे यांच्या आठवणी देखील जागवल्या. तसंच जॉर्ज फर्नांडिस यांचीही त्यांनी आठवण काढली.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच कर्तृत्वानांची खाण शोधण्याचा प्रयत्न केला. आज बाळासाहेबांचं अंत:करणापासून स्मरण करतो. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं रूपडं पालटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांचे आभार मानले. मी माझ्या जीवनात मुख्यमंत्री होण्याचा कधीही विचार केला नव्हता. ज्यांच्याशी 28 वर्ष मैत्री ठेवली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही मात्र 30 वर्ष ज्यांच्याशी मी राजकीय ‘सामना’ केला त्याच माणसांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या-