कोल्हापूरच्या निकालावरून शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले…

कोल्हापूर | कोल्हापूरमध्ये (Kolhapur) महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते. कोल्हापूर येथेदेखील असंच झालं. कोल्हापूरला विधानसभेची एक जागा रिकामी होती आणि त्याठिकाणी योग्य व्यक्तीला संधी दिली गेल्याने राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला. आता सरकारवर ज्या जनतेने विश्वास दाखवला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं शरद पवार म्हणालेत.

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी ते बोलत होते. तसेच पवारांनी भाजपला टोलाही लगावलाय.

सरसकट उसाची लागवड करू नका. त्यासोबत सोयाबीन, कापूस अशी पिके शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजेत. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होत असल्याने उसाच्या गाळपाचा प्रश्न भेडसावत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर सरकारचा भर आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2022: दिल्लीचा 16 धावांनी पराभव करत बंगळुरूचा ‘राॅयल’ विजय; DKची वादळी खेळी 

“रशिया-युक्रेनमुळे महागाई वाढली, मोदींनी तर…”, शेलारांचं वक्तव्य चर्चेत

दिल्लीत मोठा राडा! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून शांततेचं आवाहन

चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुन चंपा, सुन तारा! व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्याने उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली