राष्ट्रवादीत आता पुष्पगुच्छ, शाल भेटवस्तू बंद… त्याऐवजी ‘या’ गोष्टी द्या- शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 जूनला पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्ते. नेते आणि पक्षाचे हिंतचिंतक यांना मार्गदर्शन केलं. यावेळी कोरोनाच्या उद्रेकानंतर सर्वसामान्यांची बदलेली जीवनशैली याची जाणीव करून देताना पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी येत्या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात तर कोणत्या गोष्टी टाळाव्यात, यासंबंधीच्या सूचना पवार यांनी केल्या.

आपल्याला एकूणच जीवनपद्धती बदलावी लागणार आहे. आपल्याला अनावश्यक खर्चावर बंधन घालावे लागणार आहे. नेहमीप्रमाणे समारंभ व प्रसिद्धीसाठी अजिबात खर्च करु नये, अशी सूचना करत पुढील वर्षात पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देणे बंद करावे. त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर शक्य झाल्यास फेस शिल्ड, पी. पी. ई कीट देण्यात यावे, असे आदेशच शरद पवार यांनी दिले आहेत.

सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग (सुरक्षित अंतर) पाळावे. आपल्याला आर्थिक बचतीची शिस्त अंगी बाणवण्याची गरज आहे. राज्यातले सर्व नागरिक आपण काय करत आहोत याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. देश सावरायचा असेल, महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी द्यायची असेल तर आपण सगळे वचनबद्ध होऊया, असं पवार म्हणाले.

आज आपल्या पक्षाची सर्वसामान्यांसाठीची बांधिलकी जपणारा, गोरगरीबांसाठी संघर्ष करणारा, सामाजिक संतुलनासाठी आग्रही असणारा अशी प्रतिमा तयार झाली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या वर्धापन दिनी समर्पित होऊया लोकसेवेसाठी…. येणारे वर्ष पक्षाच्या इतिहासात एक विशेष वर्ष म्हणून नोंदवले जाईल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार देखील नाही- शरद पवार

-कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

-आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा ‘या’ नेत्याला टोला

-भारत-चीनमधील तणाव निवळला; दोन्ही देशांनी सैन्य माघारी बोलावलं

-भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला रुग्णालयात हलवलं, अहवालात कोरोना झाल्याचं उघड